एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल प्रवेश
शैक्षणिक वर्ष 2020-21


फॉर्म भरणेपूर्वी......
 1. विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला संपर्क/मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.
 2. विद्यार्थ्यांची जन्म तारीख आवश्यक आहे.
 3. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे . ( स्कॅन केलेली गुणपत्रिकेची प्रत png, jpeg, jpg, pdf ह्या स्वरूपात असावी.)
 4. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असतील ,तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे
 5. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२० आहे
फॉर्म भरताना....
 1. ऑनलाईन आवेदन पत्र भरतेवेळी पालकांनी अथवा शिक्षकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेश प्रकिया सुरु झाल्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांना SMS येईल.
 2. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या SMS नंतर पालकांनी विद्यार्थ्याच्या शाळेत जाऊन मागील शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राचे गुणपत्रक प्राप्त करून घ्यावयाचे आहे.
 3. यानंतर पालकांनी स्वत: अथवा शिक्षकांच्या मदतीने mtpss.org.in हे संकेतस्थळ आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये किंवा गावातील एखाद्या संगणक केंद्रावर जाऊन विद्यार्थ्याचा अर्ज भरण्याकरिता कार्यवाही करावी. (यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता लागणार आहे.)
 4. आता स्क्रीनवर येणाऱ्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
 5. वरील संकेतस्थळावर (mtpss.org.in) गेल्यानंतर आधी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशाकरिता अर्जाची नोंदणी करताना नमूद केलेला मोबाईल क्रमांक टाकावा. (* हा मोबाईल क्रमांक फॉर्म भरतेवेळी चालू अवस्थेत आपणाकडे असणे आवश्यक आहे.)
 6. मोबाईल क्रमांकानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकावी.
 7. यानंतर < लॉगिन करा > यावर क्लिक करावे.
 8. आता तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP (ओ.टी.पी) येईल.
 9. तुम्हाला आलेला OTP (ओ.टी.पी) संकेस्थळावर टाईप करा.
 10. OTP (ओ.टी.पी) टाकल्यानंतर आलेल्या स्क्रीनवरील < विद्यार्थ्याची माहिती > यावर क्लिक करा.
 11. आता विद्यार्थ्याच्या माहितीचा भाग सुरु होईल.
 12. या ठिकाणी विद्यार्थ्याची विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी.
 13. माहिती अचूक असल्याची खात्री करून < Submit > यावर क्लिक करा.
 14. यानंतर तुम्ही आधीच्या स्क्रीनवर परत याल. आता < विद्यार्थ्याची गुणपत्रिका > यावर क्लिक करावे.
 15. आता विद्यार्थ्याच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेचा फोटो अपलोड करावा.
 16. यानंतर < Submit > यावर क्लिक करा.
 17. आता < भरलेली माहिती बघा > यावर क्लिक करा.
 18. भरलेली माहिती पुन्हा तपासून बघा.
 19. माहिती अचूक असल्याची खात्री करून < Submit > यावर क्लिक करा.
 20. आता परिपूर्ण भरलेला ऑनलाईन अर्ज कार्यालयाकडे जमा होईल .
प्रवेश देण्याची पद्धती....
 1. आवेदन पत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम सत्राच्या गुणांची नोंद mtpss.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे.
 2. जे विद्यार्थी (त्यांचे पालक/शिक्षक/मुख्याध्यापक) वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या अर्जामध्ये विहित मुदतीत (३० सप्टेंबर २०२०) गुणांची नोंद करणार नाहीत, त्यांचा गुणवत्ता यादी तयार करताना समावेश होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
 3. विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या प्रथम सत्राच्या गुणांची एकूण ९०० पैकी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत गुणांऐवजी श्रेणी नोंदविण्यात येऊ नये.
 4. इयत्ता ५वीचे परिसर १ आणि २ या विषयांचे गुण ५० पैकी, दिलेले असल्यास सदरील गुण १०० पैकी रुपांतरित करून भरण्यात यावेत.
 5. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद झाल्यानंतर विभागनिहाय (नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर) गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
 6. पालकांच्या कायमच्या राहण्याच्या पत्त्यानुसार विभागांतर्गत गुणानुक्रमे शाळा निवड करण्यात येईल.
 7. ज्या प्रकल्पामध्ये एकलव्य निवासी शाळा नाही अशा प्रकल्पातील गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या कायमच्या पत्त्यानुसार लगतच्या प्रकल्पातील एकलव्य शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल.